श्रावण हर्डीकर होणार पुणेे महापालिका आयुक्त

0
511

पुणे, दि. ३० (पीसीबी) : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचा पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. कुठलेही राजकारण न करता गुरुवारी ४४ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता आहे. आयएएस अधिकाऱ्यांसोबतच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील होणार आहेत. आज किंवा येत्या दोन दिवसात या बदल्या होण्याची शक्यता आहे. या बदल्यांमध्ये पुण्यातून पुणे महापालिकेच्या आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राऊत, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची बदली होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून अत्यंत यशस्वी काम केलेले श्रावण हर्डीकर यांचे नाव आता पुणे महापालिका आयुक्तपदासाठी घेतले जाते.

गेल्या दोन वर्षांपासून विक्रम कुमार पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करत आहेत. ते आधी ते पीएमआरडीएचे आयुक्त होते. तर सौरभ राव हे गेली सात वर्ष पुण्यातच विविध पदांवर काम करत आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, साखर आयुक्त, पुणे महापालिकेचे आयुक्त पदावर त्यांनी काम केलं असून आता ते पुण्याच्या विभागीय आयुक्त पदांवर कार्यरत आहेत. राजेश देशमुख यांची दोन वर्षाची जिल्हाधिकारी पदाची टर्म पूर्ण झालेली आहे. या सर्व बदल्यांमध्ये हर्डीकर, विक्रम कुमार, सौरभ राव आणि राजेश देशमुख या चौघांची बदली होणार की महापालिका निवडणुका होईपर्यंत हे सर्वजण पुण्यातच राहणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या बदल्यामंध्ये आतापर्यंत यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावाचा करण्यात आलेला नाही. पण लवकरच पुणे महापालिकेला नवीन आयुक्त मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राहिलेले आणि सध्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नवीन आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यावर मुख्यमंत्री न उपमुख्यमंत्री यांचे एकमत झाल्याचे माहिती मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांनी सलग चार वर्षे आदर्श काम केले. प्रशासनातील भ्रष्टाचाराला त्यांनी बऱ्यापैकी आळा घातला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. चुकिच्या कामांना त्यांंनी पायबंद घातल्याने नागरीक समाधानी होते. तत्पूर्वी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे कायम वर्चस्व असलेल्या नागपूर महापालिका आयुक्त पदावर केलेले काम नोंद घेण्यासारखे होते. आता त्यांना पुणे महापालिकेत संधी मिळणार आहे.