दि.१४ (पीसीबी)- आर्ट ऑफ लिव्हिंग – वैदिक धर्म संस्थान संस्थेचे संत तुकाराम नगर येथील केंद्र द्वारे संत तुकाराम महाराज मंदिर येथे ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्रावण सोमवार विशेष संकल्पपूर्ती रुद्रपुजा व शिवमय सत्संग आयोजित करण्यात आला. सुमारे ५०० पुणे, पिंपरी चिंचवड मधून आलेल्या सर्व भाविकांनी ह्या वेळी रुद्रम् मंत्राच्या सानिध्यात गहन ध्यानाचा अनुभव घेतला.समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, नैराश्य घालवून सकारात्मक ऊर्जा प्रस्तापित करणाऱ्या साठी ह्या विशेष संकल्पपूर्ती रुद्रपुजा चे आयोजन केले गेले. आर्ट ऑफ लिव्हिंग बँगलोर आश्रम वरून आलेले साध्वी नित्यबोधा जी व वेद पंडित मिथीलेश मिश्रा यांच्या सानिध्यात ही रुद्रपूजा व सत्संग झाला.
सत्संग कलाकार सौरभ रत्नाकर, हेमंत पवार,प्रियंका पवार,धीरज देवकाते, गायत्री करवंदे, शुभम चिल्लाल ह्यांनी शिवमय भजन भक्तिगीते व वाद्य तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले. सर्वांचे ह्या उत्सवाचे अनुभव खूप अनमोल अद्भुत होते. सर्व आनंदाने भारावून गेले होते व महाप्रसाद चा ही आस्वाद घेतला.
आर्ट ऑफ लिव्हिंग जगभरात करत असलेल्या सेवा उपक्रमाचे प्रदर्शन हे ही विशेष आकर्षण ठरले. ह्या अद्भुत कार्यक्रमाचे आयोजन अमेय जोशी, रवी सकाटे, सचिन नाईक, श्वेता शिंदे, राधिका कुंभोजकर, मनिषा सोडणार, प्राची जगताप, जयश्री शिंदे, सीमा जाधव, शशांक देसाई, प्रतिमा नाईक, गणेश धाळपे, नीलिमा विधाते, गिरीश नाईक, कल्याणी फाळके,योगिता धाळपे, संतोषी कांबळे, अपेक्षा नेटके ह्यांनी १५ दिवस सतत अहोरात्र परिश्रम घेऊन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग वेदिक धर्म संस्थान संस्थेचे महाराष्ट्र राज्य चे समन्वयक श्रेयांश चौधरी व अक्षय दलाल, तृप्ती गुजर* आणि पिंपरी समन्वयक सचिन नाईक ह्याचे ही मोलाचे सहकार्य लाभले. आर्ट ऑफ लिव्हिंग व वैदिक धर्म संस्थान ह्यांनी हा श्रावण भर रोज असे मिळून सर्वत्र पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये २०० हून अधिक रूद्र पूजा आयोजित केल्या आहेत. हजारो लोकांना ह्या रुद्रपूजा चे अदभुत अनुभव येत आहेत.दर वर्षीप्रमाणे हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संत तुकाराम महाराज मंदिर संस्था, समाज सेवक लोकनेते दीनानाथ जोशी, वरिष्ठ नागरिक अध्यक्ष सुभाष कोळी व आर्ट ऑफ लिव्हिंग वरिष्ठ स्वयंसेवक धर्मेश कुमार ह्यांचे ही मोठे मोलाचे योगदान लाभले.वर्षभर लागणाऱ्या जन्म दिवस चे आयुष होम असो वा गो पूजा, रुद्र पूजा सर्व अनेक पूजा हवन शास्त्रोक्त पद्धतीने आर्ट ऑफ लिव्हिंग वैदिक धर्म संस्थान तर्फे आपण आपल्या घरी, आसपास आयोजित करू शकतो.