शोरूम पेक्षा कमी किंमतीत कार देतो म्हणत व्यावसायीकाची साडे दहा लाखांची फसवणूक , एकाला अटक

0
195

शोरुम पेक्षा कमी किंमतीमध्ये व लवकर कार देतो म्हणत एका टूर्स अॅन्ड ट्रॅव्हलर व्यावसायिकाची तब्ब्ल साडे दहा लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 2 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली आहे.

याप्रकरणी शंकर दिलीप गायकवाड (वय 29 रा.जुनी सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अजित कुळाल, सौरभ उर्फ संदिप सुनिल काकडे, शभम मनाळर, विकास राठोड , एक महिला साथादार व इतर यांच्यावर गुन्हा दाखलकेला आहे, यातील सौरभ काकडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या विश्वास संपादन करुन आरोपींनी फिर्यादीला इर्टींगा कार ही कमी किंमतीत व लवकर मिळवून देतो असे आमिश दाखवले. फिर्यादी यांनी गाडीसाठी 10 लाख 50 हजार 843 रुपये दिले. मात्र त्यांना कार दिली नाही. तसेच पैसे परत मागितले तर पैसे परत पाठवल्याचा खोटा स्क्रीन शॉट काढून फिर्यादीला पाठवत त्यांची फसणूक केली. यावरून ,वाकड पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.