शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

0
384

चिखली, दि. २७ (पीसीबी) – शॉप चा पत्रा ऊचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी फॅब्रिकेशन चे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी(दि.25)रात्री ते मंगळवारी(दि. 26)सकाळी या कालावधीत चिखली येथील टेक्नो क्रेटसोल्युशन नावाच्या फॅब्रिकेशन शॉप येथे घडली आहे.

याप्रकरणी अनिल लक्ष्मण शिंदे (वय 36 रा. भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या टेक्नो क्रेट सोल्युशन नावाच्या फॅब्रिकेशन शॉप चा लोखंडी पत्रा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. त्यांनी शॉप मधून 4 लाख 95 हजार 785 रुपयांचे लोखंडी फेब्रिकेशन चे साहित्य चोरून नेले आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.