शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने 84 हजारांची फसवणूक

0
250

देहूरोड, दि. २९ (पीसीबी) – शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 84 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 12 मार्च 2023 रोजी देहूरोड येथे घडला.
मनोहर नजेसू दास जॉन चिन्ना थंबी जेसू दास (वय 52, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रभात मिश्रा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून त्यांना शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष दाखवले. कर्ज देण्याच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या कारणांनी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैसे घेत त्यांना कर्ज न देता त्यांची 84 हजार 114 रुपयांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.