मुंबई, दि. 04 (पीसीबी) : मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्यांनी यावेळी देखील विजय खेचून आणला. शेळकेंना एक लाखाचं मताधिक्य मिळालं आणि ते विजयी ठरले.
आमदारकीची दुसरी टर्म असलेल्या आमदार सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आता सुरू आहेत. शेळकेंना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचं नाव आहे. माध्यमांमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या कोणत्याही पक्षातील मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही, असं सुनील शेळकेंनी म्हटलंय.