शेल पिंपळगाव येथे एकावर खुनी हल्ला

0
413

चाकण, दि. ६ (पीसीबी) – गाडीतले पेट्रोल देण्यास नकार दिल्याने एकावर चाकूने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली.

मंगेश आण्णा शिंदे (वय 33, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन उर्फ काळू रामदास कराळे (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड), अक्षय पाटील (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आणि एक अनोळखी मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन याने फिर्यादी यांना त्यांच्या गाडीतले पेट्रोल मागितले. पेट्रोल देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी नितीन याने चाकूने वार करत फिर्यादीवर खुनी हल्ला केला. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.