शेलपिंपळगाव येथे बिअर बार फोडला

0
87

चाकण, १९ जुलै (पीसीबी)
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथे एक बिअर बार चोरट्यांनी फोडले. बार मधून चोरट्यांनी 93 हजार रुपये किमतीची दारू आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आली.

शुभम राजेंद्र कदम (वय 28, रा. दिघी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम यांचा शेलपिंपळगाव येथे शुभदा परमिट रूम व बिअर बार आहे. बुधवारी रात्री त्यांनी बार कुलूप लाऊन बंद केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी बारचे शटर उचकटून आत प्रवेश केला. बार मधून दारू आणि रोख रक्कम असा एकूण 93 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.