शेतात जाऊ न दिल्याने वृद्धास मारहाण

0
83

महाळुंगे, दि. 15 (पीसीबी)

शेतात जाऊन न दिल्याच्या कारणावरून एका युद्धाला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी 11 वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील हेदृज गावात घडली.

नानाभाऊ विठ्ठल बच्चे (वय 66, रा. बच्चेवाडी, हेदृज, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दीपक गेनभाऊ बच्चे (वय 35, रा. बच्चेवाडी, हेदृज, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानाभाऊ हे रस्त्याने जात असताना आरोपी दीपक याने त्यांना अडवले. तू सखुबाई सुरेश बच्चे यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी मला जाऊ देणार नाही का, असे म्हणून नानाभाऊ यांना दीपकने शिवीगाळ केली. तसेच लाकडी काठीने पायावर मारून दुखापत केली. मी तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल, अशी दीपक याने धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.