तळेगाव, दि. 03 (पीसीबी) : शेतातून जाऊ नको म्हटल्याने शेतकऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी माळवाडी येथे घडली.
नथू भिकाजी दाभाडे (वय 49, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर दाभाडे याच्या शेतात काम करणारा मजूर फिर्यादी नथू दाभाडे यांच्या शेतातून जात होता. त्यामुळे त्याला शेतातून जाऊ नको असे नथू दाभाडे यांनी सांगितले. त्या कारणावर किशोर दाभाडे याने नथू दाभाडे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.