शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परिक्षेत पहिला

0
276

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2022 चा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूरमधील शेतकरी दाम्पत्याचा मुलगा राज्यात पहिला आला आहे. विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक पाटील यांनी 622 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील 623 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधील मुदाळ गावचा रहिवासी असलेला विनायक पाटील याचे आई वडील हे शेती करतात. मोठं होऊन सरकारी अधिकारी बनाव असं त्याचं आणि आई-वडिलांचं स्वप्न होतं.

विनायकने राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे यश मिळवलं. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचं शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. संख्याशास्त्र विषयात त्याने पदवी मिळवली.

पहिल्या पाच मध्ये येण्याची अपेक्षा होती. मात्र राज्यात प्रथम आल्याने मला आणि आई वडिलांना आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया विनायक पाटीलने दिली आहे.

18 जानेवारी 2023 गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) प्रसिद्ध करण्यात आली आहे. विनायक पाटीलनं 622 गुण मिळवत मुलांमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर धनंजय पाटील 608 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींंमध्ये पूजा वंजारी पहिली आली आहे. तिला 570.25 गुण मिळाले आहेत.