शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा

0
53

दि. २३ जुलै (पीसीबी) नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून सीतारामन यांनी शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रोजगारापासून शेतीपर्यंत सरकारच्या ९ प्राथमिकता असल्याचं सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच सांगितलं. सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्या. एक कोटी तरुणांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे.

देशातील ५०० टॉप कंपन्यांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी त्यांनी इंटर्नशिपची संधी दिली जाईल. त्या अंतर्गत तरुणांना ५ हजार रुपयांचा मासिक भत्ता देण्यात येईल. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत १२ महिन्यांपर्यंत तरुणांना मासिक भत्ता दिला जाणार आहे. १२ महिन्यांपर्यंत तरुण या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करु शकतात. देशातील टॉप कंपन्यांना पुढील ५ वर्षांमध्ये १ कोटी तरुणांना प्रशिक्षण द्यावं लागेल. लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजला होता. परिणामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ६३ जागा घटल्या. त्यामुळे पक्ष एकहाती सत्तेपासून दूर राहिला. त्याचा परिणाम मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात दिसला आहे.

कौशल्य विकासासाठी अर्थमंत्र्यांनी स्पेशल इंटर्नशिप पॅकेजची घोषणा केली आहे. तरुणांना बड्या कंपन्यांमध्ये काम करण्याची, शिकण्याची संधी मिळावी या हेतूनं सरकारनं इंटर्नशिप पॅकेज योजना आणण्यात आली आहे. या योजनेचा फायदा १ कोटी तरुणांना होईल. त्यांना इंटर्नशिप भत्ता म्हणून महिन्याला ५ हजार रुपये दिला जाईल. इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना आणखी ६ हजार रुपये वेगळे देण्यात येतील. ५ वर्षांत या योजनेचा फायदा १ कोटी तरुणांना होईल.

निर्मला सीतारामन बोलताना विरोधी पक्षाच्या खासदाराकडून गोंधळ, अध्यक्षांनी खडे बोल सुनावले
रोजगार, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यम वर्गाकडे सरकारचं विशेष लक्ष असल्याचं सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या. यासाठी सरकार ५ योजना आणत असून त्यावर २ लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. ईपीएफओच्या अंतर्गत पहिल्यांदा नोंदणी कर्मचाऱ्यांच्या खात्यात सरकार १५ हजार रुपये जमा करेल. रोजगाराला चालना देण्यासाठी सरकार तीन प्रोत्साहन योजना सुरु करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.