चिंचवड, दि. 25 (पीसीबी) : शेअर्स खरेदी विक्री करणे व आईचे आजारपण या दोन्ही गोष्टींचा बहाना करत 65 वर्षे नागरिकाला 21 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ही फसवणूक मी ते जुलै 2024 या कालावधीत चिंचवड येथे घेतले आहे.
याप्रकरणी सेवानिवृत्त 65 वर्षे नागरिकांनी निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.24) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी स्टॉक एक्सचेंज 69 हा व्हाट्सअप ग्रुप, मल्लिका वर्मा ही अज्ञात महिला व प्री मॅनेजमेंट लिमिटेड हे फेसबुक अकाउंट यांच्या वापरकर्त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने व्हाट्सअप द्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांना प्री मॅनेजमेंट लिमिटेड फेसबुक पेजवर शेअर्स खरेदी विक्री बाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती दिली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून मलिका वर्मा या महिलेने फिर्यादी यांना शेअर्समधून नफा मिळवण्यासाठी विविध बँक खात्यावर एकूण 18 लाख रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन होताच मल्लिका हिने फिर्यादींना आपल्या आईच्या आजारपणाचा बहाणा करत पुन्हा साडेतीन लाख रुपये उकळले. मात्र पैसे मिळताच फिर्यादी यांना व्हाट्सअप ग्रुप मधून काढून टाकले. तसेच त्यांच्या कोणत्याही मेसेजचा व कॉलचा रिप्लाय दिला नाही. या सर्व प्रकरणात फिर्यादी यांची 21 लाख 50 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.