शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यास सांगून सव्वाचार लाखांची फसवणूक

0
141

शेअर मार्वेâटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून एकाची सव्वाचार लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे २४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला.

४५ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलीम रामजी, मेलीस्सा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर एक जाहिरात आली होती. त्यामध्ये तुमचे पैसे पाच पटीत वाढवून मिळतील, असे नमूद होते. फिर्यादी यांनी ती लिंक ओपन केली असता ते एका व्हाटसअ‍ॅप ग्रुपला जॉईन झाले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्वेâटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी १९ लाख ७० हजार गुंतविले. आरोपींनी त्यांना १५ लाख ४६ हजार रुपये परत केले. मात्र, त्यावरील परतावा न देता फिर्यादीची ४ लाख २४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. पोलीस निरीक्षक महेश बनसोडे तपास करीत आहेत.