शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने 29 लाखांची फसवणूक

0
214

मारुंजी, दि. ११ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 29 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत मारुंजी येथे घडली.

पराग प्रफुल लोहगावकर (वय 35, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 447480611104 क्रमांक धारक, ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 नावाचा व्हाटस अप ग्रुप, IND SES नावाचे अॅप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहगावकर यांच्या फोनवर 447480611104 क्रमांक धारक व्यक्तीने व्हाटस अप मेसेज केला. त्यानंतर त्यांना ROWE PRICE STOCK PULLING GROUP D88 नावाचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना IND SES नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यातून लोहगावकर यांचा विश्वास संपादन करून ट्रेडिंग करून त्याद्वारे नफा कमावण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्यांच्याकडून 29 लाख 63 हजार 599 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.