शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिलेचे 94 लाख रुपयांची फसवणूक

0
90

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 94 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 17 जून 2024 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत पिंपरी वल्लभनगर येथे घडली आहे.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल कपूर ऋत्विक एंटरप्राइजेस, बंगाल प्लास्टिक, वैष्णवी कॉमेंट सर्विस, मधुसूदन क्रेन वर्क अशा विविध बँक खातेदार व मोबाईल क्रमांकधारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी गुगलवर एक जाहिरात पाहिली जाहिरातीची लिंक ओपन केली. यावेळी फिर्यादी यांना 7722013569 हे मोबाईल क्रमांक वरून व्हाट्सअप वर मेसेज आला. यावेळी त्यांना शेअर्स खरेदी विक्री व त्यातून मिळणाऱ्या नफा याबाबत माहिती देण्यात आली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी स्वतःची ओळख लपवत विविध बँक खात्यावर फिर्यादी यांच्याकडून 94 लाख 27 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.