पुणे, दि. २ (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूकीचे आमिष दाखवून तरुणाची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 2 नोव्हेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला आहे.
सोमनाथ जनार्दन देवकर (वय 34 रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून महिला आरोपी व विक्रम बजाज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला इन्स्टाग्राम शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जास्तीचा परतावा मिळेल असे सांगितले फिर्यादीला एक अप डाऊनलोड करण्यास सांगून 1 लाख 30 हजार गुंतवले . मात्र त्यांनतर परताव्या बाबात विचारणा केली असतचा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देत होते.अशा प्रकारे फिर्यादीचा नफा 5 लाख 65 हजार व गुंतवलेले 1 लाख 30 हजार असा एकूण 6 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केली यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,










































