शेअर मार्केटमध्ये पैसे गंतवणुकीचे अमिष दाखवून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक

0
185

वाकड, दि. १ (पीसीबी) – स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.ही फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.

पराग मधुकरराव गावंडे (वय 37 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आशिष शहा, क्षितिजा फरिहा, राहुल सिंग व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी यांना आरोपीने स्टॉक मध्ये पैसे गुंत्वण्यास सांगून मोठ्या परताव्याचे अमिष दाखवले. यावेळी फिर्यादी यांनी गुंतवलेले पैसे व त्याचा नफा न देता फिर्यादी यांची 29 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे