शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 49 लाखांची फसवणूक

0
94

हिंजवडी, दि. 19 (पीसीबी) : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 49 लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सहा ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केएसएल कोटक नावाचे एप्लीकेशन व व्हीआयपीसीसीपी एक केएसएल रिसर्च नावाच्या व्हाट्सअप ग्रुपचा ॲडमिन चिनम्या रेड्डी, कोटक कम्युनिटी मॅनेजर, कोटक रिलेशन मॅनेजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी केएसएल कोटक नावाचे एप्लीकेशन मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड केले होते. त्या एप्लीकेशनवर आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांना शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 49 लाख दहा हजार रुपये गुंतवणूक केली. फिर्यादी यांनी केलेली गुंतवणुकीची रक्कम त्यांना परत न करता खाते ब्लॉक झाल्याचे सांगून आरोपींनी त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.