शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने 77 लाखांची फसवणूक

0
106

भोसरी, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देऊन एका तरुणाची 77 लाख 43 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 ते 29 मे 2024 मध्ये मोशी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली.सुजित सुर्यकांत पाटील (वय 31, रा. साहिल ओम पार्क, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात मोबाइल व लिंक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुरुवातीला काही परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी टास्क देऊन 77 लाख 43 हजार 800 रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर भरलेले पैसे अथवा परतावा न देता फिर्यादी सुजित पाटील यांची आर्थिक फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.