शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने 14 लाखांची फसवणूक

0
368

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – शेअर मार्केट मधील गुंतवणुकीच्या बहाण्याने एका महिलेची 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत वल्लभनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मरीलेना (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला अल्फा एक्सिस नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याच्या माध्यमातून फिर्यादीस शेअर खरेदी विक्री करण्यास सांगितले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीने फिर्यादीकडून 14 लाख 19 हजार 59 रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.