शेअर मार्केटच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

0
76

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) निगडी,
शेअर मार्केट क्लासेससाठी एक लाख 30 हजार 337 रुपये घेतले. त्यानंतर डीमट खात्याची माहिती घेऊन त्यात सहा लाख 23 हजार 910 रुपये नुकसान केले. एकूण व्यक्तीची सात लाख 54 हजार 247 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 फेब्रुवारी ते 31 जुलै या कालावधीत निगडी येथे घडली.

याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8269550333, 9111414950, 9903743619 या क्रमांकावरून बोलणारा जितेंद्रसिंग आणि 9339494323 या क्रमांकावरून बोलणारा आशिष बिस्वास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस फोन करून त्यांच्याकडून शेअर मार्केट क्लासेससाठी एक लाख 30 हजार 337 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या डीमट खात्याचे लॉगीन डीटेल्स घेत त्यावरून सहा लाख 23 हजार 910 रुपयांचे नुकसान करत एकूण सात लाख 54 हजार 247 रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.