शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3.56 लाख कोटी पाण्यात

0
418

मुंबई,दि.०३(पीसीबी) – शेअर बाजारासाठी कालचा दिवस नकारात्मक राहिला असून सर्वच क्षेत्रामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 677 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 207 अंकांची घसरण झाली. शेअर बाजारातील आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना तब्बल 3.56 लाख कोटी रुपयांना फटका बसल्याचं स्पष्ट झालं.

सेन्सेक्स 677 अंकांनी घसरुन 65 हजार 782 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 207 अंकांनी घसरत 19 हजार 526 अंकांवर बंद झाला. अमेरीका, युरोप आणि चीनमधील कमकुवत आर्थिक आकड्यांमुळे जागतिक बाजारात गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतला. त्यामुळे वॉल स्ट्रीट आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. डॉलरच्या तुलनेत रुपया देखील 32 पैशांनी कमकुवत झाला असून डॉलरच्या तुलनेत रुपया 82.58 वर बंद झाला.

शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मात्र मोठा फटका बसला असून त्यांच्या 3.56 लाख कोटी रूपयांचा चुराडा झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या एकूण भांडवल 306.80 लाख कोटीवरून 303.24 लाख कोटीवर पोहोचले आहे.

Hero MotoCorp, Tata Motors, Tata Steel, NTPC आणि Bajaj Finserv या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर Divis Labs, Nestle India, HUL, Tech Mahindra आणि Asian Paints कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं.

सर्वच क्षेत्रामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. कॅपिटल गुड्स, सार्वजनिक बँका, उर्जा, मेटल या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची घसरण झाली. तर ऑटो, बँक, रिअॅलिटी, ऑईल अँड गॅस क्षेत्रामध्ये एका टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचं दिसून आलं.

टॉप निफ्टी लूजर्स
Divis Labs- 1.40 टक्के
Nestle – 1.28 टक्के
HUL – 0.70 टक्के
Asian Paints- 0.60 टक्के
Tech Mahindra- 0.19 टक्के
टॉप निफ्टी गेनर्स

Hero Motocorp- 3.50 टक्के
Tata Steel- 3.45 टक्के
Tata Motors- 3.26 टक्के
Bajaj Finserv – 2.88 टक्के
NTPC- 2.69 टक्के
मंगळवारी मोठी वाढ

मुंबई शेअर बाजारावर (BSE) लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 ऑगस्ट रोजी 306.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी 31 जुलै रोजी बाजार भांडवल 306.80 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 21 हजार कोटी रुपयांनी वाढले होते. आज त्यामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलं.