शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच41 लाख कोटी रुपयांची राख

0
2

अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम आता शेअर बाजारांवर स्पष्ट दिसत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाच्या भडक्यात बाजारातील गुंतवणूकदारांची लाखो कोटी रुपयांची संपत्ती राख झाली. त्यामुळे आता अशावेळी योग्य रणनीती अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

देशांतर्गत बाजाराने 2026 ची सुरुवात जरी काहीशा कमकुवत केली इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामध्ये झालेल्या वाढीमुळे दलाल स्ट्रीटवर मंदीवाल्यांची म्हणजे बेअर अटॅकची पकड घट्ट झाली. अमेरिका-इराण युद्धाच्या सुरुवातीपासून BSE वर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 9% हून अधिक म्हणजेच सुमारे 41 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यावरून जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर Sell-off स्पष्ट दिसून येतो.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारही हादरला असून संघर्ष सुरू झाल्यापासून बाजारात मोठी घसरण झाली ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले. गेल्या एका महिन्यात म्हणजे मिडल-ईस्टमधील तणावाच्या परिस्थितीत सेन्सेक्समध्ये 7700 हून अधिक अंकांची किंवा 9.5% —घसरण झाली. जागतिक अनिश्चितता आणि तेलाच्या वाढत्या किंमतींनी या घसरणीला खतपाणी घातले.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली, ज्यामुळे महागाई आणि आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता वाढली परिणामी कंपन्यांच्या नफा कमी होण्याची भीती निर्माण झाली परिणामी शेअर बाजारात विक्री वाढली. तसेच सध्याच्या पातळीवर बाजाराचे मूल्यांकन संतुलित दिसत असल्याचे काही तज्ञांनी उद्धृत केले.

आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, शुक्रवारच्या सत्रात, सेन्सेक्समधील हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये एका दिवसात 4.6% मोठी घसरण झाल्यामुळे मुंबई शेअर बाजार 1,690 अंक किंवा 2.3% घसरून 73,583 अंकांवर स्थिरावला. सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातदारांवर विंडफॉल टॅक्स (अतिरिक्त नफ्यावर कर) लागू केल्यामुळे RIL स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा लागला.