शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक

0
99

चिंचवड, दि. 13 (प्रतिनिधी)

शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून एका तरुणाची एक लाख 22 हजार 71 रुपयांची फसवणूक केली. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे 23 मार्च रोजी घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने मंगळवारी (दि. 13) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम (9571946708) आणि बँक ऑफ इंडियाचा खातेधारक, उत्कर्ष स्मॉल फायनान्सचा खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये एक लाख 22 हजार 71 रुपये भरण्यास सांगितले. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांचे पैसे परत न देता फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.