शेअर खरेदी विक्रीतून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने 18 लाखांची फसवून

0
71

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : शेअर खरेदी विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 18 लाख 44 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 30 मार्च ते 13 मे या कालावधीत पिंपरी गाव येथे घडल.

या प्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, विनीत झिंदाल, तसेच श्री सिद्धी एंटरप्रायजेस, भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, यूएसबीएम लिमिटेड आणि शेरा इंटरप्राईजेस यांच्या बँक खात्यावर व्यवहार झाल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना फिर्यादी यांना इंस्टाग्रामवर जाहिरात दाखवून त्यांच्याशी संपर्क केला. शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री करून चांगला नफा मिळवून देतो असे त्यांना सांगण्यात आले. त्यावरून शेअर खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी कडून 18 लाख 44 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.