शेअर मार्केटमध्ये शेअर आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास सांगत महिलेची 4 लाख 97 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एक फेब्रुवारी ते 26 एप्रिल या कालावधीत पिंपरी गाव येथे घडला.
याप्रकरणी महिलेले पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महीलेसोबत फोनवरून संपर्क केला. त्यांना शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्री बाबत प्रशिक्षण देतो असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर आयपीओ शेअर्स खरेदीसाठी पैसे पाठवण्यास सांगितले. महिलेने पैसे पाठविले असता त्यांना पुढील माहिती तसेच त्यांची गुंतवलेली रक्कम परत न देता फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.









































