शेअर्स खरेदी च्या बहाण्याने नागरिकाची 35 लाख रुपयांची फसवणूक

0
257

पिंपरी, दि.4 (पीसीबी) – शेअर्स खरेदीचा बहाणा करत एका 49 वर्षीय नागरिकाची तब्ब्ल 35 लाख रुपयांची फसवणूक केली आहे,. हा सारा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे,

याप्रकरणी आदित्य तुकाराम रानभरे (वय 49 रा. निगडी प्राधिकारण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याददिली असून आदित्य पाटील, मनोज कुमार व इतर दोन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका व्हॉटसग्रुपवर घेतले. तिथे शेअर्स खरेदी बद्द्ल सांगितले जायचे. ग्रुप एडमिन ने फिर्यादी यांना पी.टी.अप्लिकेशन मध्ये जाऊन शेअर्स विकून पैसे काढून घेण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते पैसे काढले मात्र त्यांच्या खात्यात ती रक्कम दाखल झाली नाही. फिर्यादी यांनी ग्रुप एडमीन ला फोन करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही संपर्क झाला नाही. याप्रकरणात फिर्यादी यांनी 35 लाख 40 हजार 310 रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ती रक्कम परत न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली आहे.