शेअर्स खरेदीच्‍या नावाखाली २१ लाखांची फसवणूक

0
75

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : शेअर्स खरेदीच्‍या नावाखाली एकाची २० लाख ९२ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना १९ जुलै २०२४ ते १६ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत वैभवनगर, पिंपरी येथे घडली.

याबाबत ४८ वर्षीय नागरिकाने सोमवारी (दि. २६) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवांगी( मोबाइल नंबर ७०४३१२४२८९), महेश गुप्ता (मोबाइल नंबर .नन ७७८२०७१७८०) तसेच बॅक खातेधारक माँ भगवती एंटरप्राईजस यांचे बंधन बैंक अकाउंट नंबर-२०१०००२८३७०५५१, एस.पी. एंटरप्राईजस यांचे कॉसमॉस बैंक अकाउंट नंबर ०९५१००७०२८४, एस.जी नेटवर्क सोलुशन यांचे युनीयन बँक अकाउंट नंबर १८९१११०१००००१३८, ड्रीम हाउस डिकोर यांचे बंधन बँक अकाउंट नंबर २०१०००३०२५५९२८, जय भोले ट्रेडींग यांचे ॲक्सीस बँक अकाउंट नंबर ९२४०२००१५१४८९६५, न्यु फॅन्सी एटरप्राईज यांचे बंधन बँक अकाउंट नबंर २०१०००२९२७३२८२ यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना इस्टाग्रामवर जाहीरात दाखवून व्हॉट्सअप मोबाइल क्रमांक धारक ७०४३१२४२८९ यांनी फिर्यादी यांच्या मोबाइलवर कॉल व मॅसेजव्दारे संपर्क साधला. स्टॉक मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री करुन नफा देतो, असे सांगून आरोपी यांनी वेगवेगळे बँक खाते क्रमांकवरण शेअर्स खरेदीच्या नावाने शेअर्समध्ये पैसे गुंतविण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी स्‍वतःची ओळख लपवून फिर्यादी यांची २० लाख ९२ हजार ९०० रुपयांची अर्थिक फसवणुक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.