शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 54 लाखांची फसवणूक

0
91

हिंजवडी, दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकांची 54 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 6 मे ते 13 जून 2024 या कालावधीत बावधन येथे घडली.

याप्रकरणी 60 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना जादा परताव्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्याशी खोटे बोलून त्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांनी गुंतवणूक केलेली 54 लाखांची रक्कम परत न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.