शेअर्सच्‍या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

0
154

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) चिंचवड,

शेअर्सच्‍या नावाखाली एका नागरिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चिंचवड येथे घडली.

याबाबत ५५ वर्षीय नागरिकाने सोमवारी (दि. १२) चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल धारक ६२८२३९०६१८११७, शिवांगी सारडा, https://play.google.com/store/apps/details?id=com.mopplushe.app लिंकधारक आणि बँक ऑफ बरोडा संसार ट्रेडर्स अकाऊंट यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२४ ते २४ मे २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर्समध्‍ये पाच लाख रुपये गुंतवणूक करण्‍यास सांगितले. ते पैसे परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.