शिव संग्राम प्रतिष्ठान ओम मित्र मंडळ” तर्फे सफाई कर्मचऱ्यांचा सत्कार

0
3

दि.६ (पीसीबी) -संत तुकाराम नगर येथील “शिव संग्राम प्रतिष्ठान ओम मित्र मंडळ” तर्फे पिंपरी चिंचवड महानगर पालिका सफाई कर्मचारी यांचा त्यांच्या समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला.

सर्वत्र मोठ मोठ्या मान्यवर पाहुण्यांचा सत्कार हा होतोच पण त्याच बरोबर आपल्या सर्वासाठी दररोज सर्वोत्तम काम करणाऱ्या आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवणाऱ्या कित्येक सफाई कर्मचाऱ्यांना ही सन्मान दिला गेला हा एक वेगळा उपक्रम ओम मित्र मंडळ राबवला, ह्या मुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला.

दहा दिवसा साठी सुंदर अप्रतिम देखावा, विविध खेळ, भजन आणि जल्लोष मध्ये मोठ्या उत्साहात बाप्पांचं विसर्जन मिरवणूक शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी झाली.
सत्यनारायण पूजा महाप्रसाद चा लाभ ही ३५० पेक्षा जास्त भाविकांनी घेतला.
मंडळाचे कार्यकर्त्यांनी स्वतः बनवलेले दिवसभर जलाभिषेक ज्यावर होत होता असे मोठे शिवलिंग ही मुख्य आकर्षण बनले.

येणारा शारदीय नवरात्री उत्सव ही उत्साहात साजरा करण्याचे ह्या मंडळाने योजले आहे सोबत असेच काही समाज प्रबोधन समाज कार्य करण्याचे योजत आहेत