शिवी देऊ नको म्हटल्याने दहा जणांची सात जणांना मारहाण

0
397

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी मधील नेपाळी मार्केट येथे शनिवारी (दि. 3) रात्री दहा जणांनी मिळून सात जणांना मारहाण केली. शिवीगाळ करू नको असे म्हटल्यावरून हा वाद पेटला.

मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी (वय 22, रा. काळेवाडी), यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फारूक सत्तार कुरेशी (वय 42), फिरोज सत्तार कुरेशी (वय 55), रिहान फारूक कुरेशी (वय 18), आपु फिरोज कुरेशी (वय 18, सर्व रा. नेहरूनगर पिंपरी) आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज कुरेशी हा फिर्यादी यांच्या दुकानासमोर आला. त्याने फिर्यदीला शिवीगाळ करून त्यास घरी सोडण्याचा दम दिला. त्यावरून फिर्यादी यांनी आरोपीला शिवीगाळ करू नको असे म्हटले. त्या कारणावरून आरोपीने भांडण काढून फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली. तसेच धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.