शिवीगाळ केली म्हणून तरुणावर चाकूने वार

0
94

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – शिवीगाळ केली म्हणून तरुणावर चाकूने वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.29) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी श्रीधर. उत्तम जावळे (वय 39 रा. भोसरी) याला अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वैभव अशोक कदम (वय 25 रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवरून आरोपीच्या भावाला शिवीगाळ केली म्हणून आरोपीने घरात घुसून चाकूने फिर्यादीवरून वार केले.एक वार गळ्यावर खोलवर वार केल्याने फिर्यादी जखमी केले.यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.