शिवीगाळ का करतो याचा जाब विचारल्याने कुटुंबास मारहाण

0
81

चाकण, दि. 24 (पीसीबी) : शिवीगाळीचा जाब विचारल्याने तीन जणांनी मिळून पती, पत्नी आणि मुलीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी खेड तालुक्यातील बहुळ या गावी घडली.

संभाजी लक्ष्मण खलाटे, विशाला संभाजी खलाटे आणि करण संभाजी खलाटे (सर्व रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सत्यवान विठ्ठलराव खलाटे (वय 42, रा. बहुळ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी सत्यवान हे लाकडी बांबूची काठी घेऊन टाकीचे पाणी सोडण्यासाठी चालले होते. त्यावेळी आरोपी विशाल खलाटे हा तिथे येऊन शिवीगाळ करीत होता. यामुळे सत्यवान यांनी शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली. यामुळे संतापलेल्या आरोपीने फोन करून इतर दोन आरोपींना बोलावून घेतले. आरोपी संभाजी खलाटे याने फिर्यादी यांच्या हातातील काठी हिसकावून त्यांनाच मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सत्यवान यांच्या डोळ्याच्या वरील भागास मारली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची पत्नी व मुलीलाही आरोपींनी शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.