शिवाजी पाडुळे, अरुण पवार चिंचवडसाठी मनोज जरांगेच्या भेटिला

0
69

सांगवी, दि. २१ (पीसीबी) : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाडुळे, वृक्षप्रेमी अरुण पवार यांची नावे चर्चेत आली आहेत. दरम्यान, पाडुळे आणि पवार यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली आहे.

मराठाआरक्षण लढ्यात दिलेलं योगदान,२० वर्षाचा संघर्षमय सामाजिक राजकीय प्रवास समजून घेऊन चिंचवड विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी सामान्य कार्यकर्त्यास विश्वासाने संधी दिल्यास मायबाप जनता किती आशिर्वाद देईल, असा विश्वास स्वतः .शिवाजी पाडुळे यांनी व्यक्त केली आहे.
नवी सांगवी प्रभागातून २०१७ ला महापालिकेची निवडणूक पाडुळे यांनी लढविली होती. मराठा कार्ड तसेच कोरोना काळात केलेल्या कामाची पावती म्हणून लोक मला मतदान करतील अशी खात्री पाडुळे यांना आहे.

मराठवाडा मित्र मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते अरुण पवार यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि उमेदवारी मिळावी अशी विनंती केली आहे. सामाजिक कार्यात पवार यांचे मोठे योगदान आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.