शिवाजी आढळराव पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा; शासनाने काढले आदेश

0
45

मंचर,दि. ६ (पीसीबी) –

म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तशी अधिसूचना आज काढण्यात आली आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील विभागीय मंडळापैकी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सभापती पदावर 23 जुलैला पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. तसा शासन आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव अजित कवडे यांनी आज गुरुवारी काढला आहे. राज्यमंत्रीपदाच्या अनुषंगिक सेवा सेवा सुविधा आता त्यांना देण्यात येणार आहे.

दरम्यान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद तालुक्याला असतानाच आता आढळराव पाटील यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद तालुक्याला मिळाले आहे. याद्वारे तालुक्याला दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. लांडेवाडी येथील निवासस्थानी अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत.