पुणे, दि. २ (पीसीबी) – शिवसेनाचे बंडखोर नेते आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. ही भेट पुण्यात झाली आणि या भेटी विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली आशी माहिती आढळराव यांनी दिली. दरम्यान, आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर जहरी टीका केल्याने राजकारणात खळबळ आहे.
पालकमंत्री पाटील यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर निशाना साधला. हिवाळी अधिवेशन चालू असताना शेवटच्या दिवशी बोलत असताना अजित पवार म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, ते धर्मवीर नव्हते त्यांमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
यावर आढळराव म्हणाले की, “शेकडो वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर मानल जातं पण आता अचानक असे विषय काढले जातात. राष्ट्रवादीला काय झालंय ते कळत नाही. तर त्यांनी भाऊ तोरसेकर यांच एक वाक्य सांगितलं ते म्हणाले की राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे. आता याबाबत महाराष्ट्राने ठरवावे.
अजित पवारांच्या त्या विधानाने महाराष्ट्रातून संतापाच्या भावना अनेक भागातून समोर येत आहेत, अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं ते कुठलाही अभ्यास न करता केलेला आहे. चर्चेत राहिचं असेल किंवा त्यांची पवार स्टाईल आहे जे विधान त्यांनी धरणावर केलं तसंच हे विधान आहे. त्यांना खासदार अमोल कोल्हे यांच्या बद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ” यावर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांनी कुठेही जावं त्यांचा आपल्याला काही फरक पडत नाही.
दरम्यान 2024 ची निवडणुक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार आणि जिंकणार. तर त्यांनी ठणकावून सांगितले की मला संधी मिळाली तर मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे