शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलेंडरचा स्फोट

0
2

– वाकड येथील पोलिस अंमलदार जखमी
पिंपरी दि. 12 (पीसीबी) : शिवाजीनगर न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये वाकड पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलिस अंमलदार जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
निलेश सुभाष दरेकर, असे जखमी अंमलदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पोलिस अंमलदार यांना गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर येथे कोर्ट येथे कर्तव्य होते. दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी कोर्टासमोरील एका हातगाडी जवळ गेले. त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे.