-भोसरी,लांडेवाडी येथे ९ ऑगस्ट रोजी सभेचे आयोजन
पिंपरी, ८ ऑगस्ट (पीसीबी) – महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच पातळीवर सध्या घसरण झाली आहे. यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा करण्यात आली असून, या शिवस्वराज्य यात्रेचे ९ ऑगस्ट रोजी भोसरी येथे सायंकाळी सात वाजता भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रकाश आप्पा म्हस्के, , स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, सुलक्षणा शिलवंत, गिता मंचरकर, गणेश भोंडवे, देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, ज्ञानेश आल्हाट, धनंजय भालेकर, प्रविण भालेकर, समीर मासुळकर, तानाजी खाडे, संजय उदावंत, विशाल जाधव, संजय नेवाळे, पंकज भालेकर, वसंत बोराटे, प्रदीप तापकीर, विनायक रणसुभे, संजय उदावंत, निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, मुंबईमध्ये शिवस्वराज्य यात्रा २ ची घोषणा आमचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली ९ ऑगस्टला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात होणार आहे. यानंतर महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा २ मार्गक्रमण करेल. ही यात्रा पिंपरी चिंचवड शहरातून मार्गस्थ होणार आहे. यापैकी भोसरी येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता लांडेवाडी येथे ही सभा पार पडेल.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले , राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. बेरोजगारी वाढली आहे. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार ,गुंडगिरीने अक्षरशः थैमान घातले आहे. आपले पिंपरी चिंचवड देखील या गोष्टीला अपवाद राहिलेले नाही. ज्या भोसरी मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा मार्गक्रमण करणार आहे . त्या ठिकाणी भ्रष्टाचार, दहशत , दबाव तंत्राने अक्षरशः कळस गाठला आहे . त्यामुळे या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे. भोसरीमध्ये ही यात्रा आल्यानंतर यात्रेचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता लांडेवाडी चौकात सभा पार पडेल. या सभेमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते देखील मार्गदर्शन करतील
शिवस्वराज्य यात्रा ‘या’ मतदारसंघातून जाणार
जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, भोसरी, शिरूर, हडपसर, खडकवासला, दौंड, इंदापूर, बारामती, माळशिरस, मोहोळ, सोलापूर उत्तर, माढा, करमाळा, परांडा, तुळजापूर, उदगीर, अहमदनपूर, केज, आष्टी, बीड,माजलगाव, परळी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, बसमत, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन या भागातून शिवस्वराज्य यात्रा मार्गक्रमण करणार आहे.