मुंबई दि.२३ : शिवसेना ठाकरे गटाला रोज नवनवे धक्के बसत आहेत. राजन साळवी यांच्यासारखा कोकणातील वाघ काल उध्दव ठाकरे यांना रामराम करून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करता झाला. आता राज्याचे संघटक असलेले एकनाथ पवार यांनीसुध्दा ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि पुन्हा भाजपमध्ये स्वगृही प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एकनाथ पवार यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. शिवसेनेतील गटबाजी आणि एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पुन्हा भाजपमध्ये आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघातून पवार यांनी शिवसेनेने उमेदवारी दिली होती. परावभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही जाण्याचा निर्णय केला. पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ ते २०२२ दरम्यान भाजपची सत्ता असताना सत्ताधारी नेते म्हणून पवार यांनी अत्यंत प्रभावी काम केले.