शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ….

0
222

– आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात

कल्याण, दि. ८ (पीसीबी) : शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेचे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांचे स्वागत करण्यात. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

केडीएमसीचे 40 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने येथे शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. या सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट घेतली आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहेत. आता स्थानिक पातळीवरही मोठे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

तसेच नवी मुंबईतही शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. येथेही काही नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. काही जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शिवसेनेत मुंबईसह उपनगरात मोठी पडझड होताना दिसून येत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले होते. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता शिवसेना गळती लागल्याचे दिसून येत आहे. काल ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. केवळ एकच नगरसेवक शिवसेनेसोबत राहिला आहे.