नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच मध्यरात्रीपासून दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १२ खासदारांनी भेट घेतली आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा राजधानी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी खासदारांबाबतही मोठं विधान केल होतं. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. असे म्हटले होते. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेमध्ये आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. पण, आता खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
शिंदे गटात सामील झालेले खासदारांमध्ये हेमंत गोडसे (नाशिक), राजेंद्र गावित(पालघर), धैर्यशील माने ( हातकणंगले), संजय मंडलिक (कोल्हापूर), सदाशीव लोखंडे (शिर्डी), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम),
राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), श्रीरंग बारणे (मावळ), श्रीकांत शिंदे (कल्याण), प्रताप जाधव (बुलढाणा)
,कृपाल तुमाने ( रामटेक), हेमंत पाटील (हिंगोली) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर द्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत. असे राजकीय वर्तुळात सांगण्यात येत आहे.