शिवसेनेचा व्हिप झुगारुन बंडखोर आमदारांचे मतदान

0
246

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – शिवसेनेचा व्हिप झुगारून बंडखोर शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणुकित मतदान केले. मतदानाच्या वेळी काहिसा गोंधळ झाला. सुरवातीला आवाजी मतदानाने कौल घेण्यात आला आणि नंतर ठराव प्रत्यक्ष मतदानासाठी टाकण्यात आला. भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजुने १६१ वर मतदान झाले. विरोधातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी मतदान सुरू आहे.

व्हीप म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून पक्षादेश असतो. पक्ष सभागृहात एखादं विधेयक किंवा काही मुद्द्यांवर आपली भूमिका घेत असतो. त्यासंदर्भातील आदेश पक्षातील सदस्यांना दिले जातात. पक्षाने आदेश दिल्यानंतर तो सदस्यांना पाळावाच लागतो, त्याला व्हीप म्हणतात. विधीमंडळात पक्षातील शिस्त कायम राहावी यासाठी व्हीपचा वापर होतो. अर्थात व्हीप काढणे राजकीय पक्षाचा अधिकारच असतो.

अनेक मुद्द्यावर पक्षातील सदस्यांमध्ये मतभेद असतात. सदस्यांची भूमिका कधी कधी वेगळी असते. मात्र पक्षाची भूमिका संबंधीत सदस्याने पाळणे आवश्यक असते. तसेच पक्षाच्या धोरणानुसार सदस्याला मतदान करावे लागते.
पक्षातील सदस्यांना व्हीपद्वारे पक्षाची भूमिका पाळण्याचे आदेश दिले जातात.