शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांचे निधन

0
806

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके कार्यकर्ते तसेच पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख बाजीराव धोंडीबा लांडे पाटील (वय-६१) यांचे खासगी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे या त्यांच्या कन्या आणि माजी नगरसेवक रवी लांडगे हे त्यांचे जावई होत. शिवसेनेचे शहरातील निष्ठावंत कार्यकर्ते हा त्यांचा परिचय अखेरपर्यंत कायम होता. हवेली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळात्यांनी निवडणूक लढवली होती.

त्याशिवाय शहर शिवसेनेचे प्रमुख असताना त्यांची कारकिर्द गाजली. याशिवाय पीसीेमटी सदस्य, हवेली तालुका प्रमुख तसेच महाराष्ट्र श्रमिक सेनेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. अत्यंत आक्रमक असा शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता गमावला अशी भावना राजकीय गोटातुन व्यक्त करण्यात आली सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर भोसरी येथील स्मशानात अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू भाऊसाहेब लांडे यांनी सांगितले.