शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख कै. शरद नथू हुले यांचे निधन

0
235

पिंपरी, दि.७ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर मधील सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख कै. शरद नथू हुले (वय-५७) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक कार्यात सहभागी असायचे तसेच ते शिवसेनेत देखील वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते .

त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळाल नाही त्यांनंतर त्यांनी समाजकारण सुरु ठेवलं . त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी , मुले आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि . ७-७-२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता नेहरूनगर स्मशान भूमीत होणार आहे .