दि.१६(पीसीबी)-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशासाठी चढोओढ सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सुरू आहेत. आकुर्डी दत्तवाडी प्रभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
महापालिकेतील शिवसेनेच्या मोजक्या चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेस केला होती त्यात कुटे अग्रभागी होते. ठाकरे यांच्या शिवसेनेतून कुटे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अफाट जनसंपर्क आणि कामाच्या जोरावर कुटे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.युवासेना पिंपरी विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांनीसुध्दा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेस केला.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे आदी यावेळी उपस्थित होते.










































