शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर गुन्हा, तत्काळ अटक

0
172

-मशीन उलट्या लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा भोसले यांचा आरोप आहे.

दि १३ मे (पीसीबी ) – शिवसेनेचे पिंपरी चिंचवड (उध्दव ठाकरे गट) शहराध्यक्ष सचिन भोसले यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. थेरगाव येथील बारणे शाळेत ही घटना घडली.

मतदान यंत्र उलटे लावल्याचा आरोप करीत व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना वाद झाला. तर मशीन उलटे लावल्याचा जाब विचारल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा भोसले यांनी दावा केला आहे.