शिवसेनेचा मुंबई महापालिकेवर १ जुलैला महामोर्चा

0
225


मुंबई, दि. २० (पीसीबी) – गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली. दरम्यान, या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. तसेच सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही.अशी टीका ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

नगरसेवकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध घटनेवर भाष्य केलं. सध्याचं सरकार बेकायदेशीर आहे. मुंबईला मायबाप उरलेल नाही. बऱ्याच दिवसानंतर नगरसेवकांशी संवाद साधला. महापालिकेत जो भ्रष्टाचार झाल्या त्या प्रकरणी १ जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चाच नेतृत्व करणार आहेत. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

काही ना काही कारणानं पालिकेची उधळपट्टी सुरु आहे. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. मंत्र्यांना क्लिनचीट देण शिंदे सरकारकडून सुरु आहे.पालिकेच्या तिजोरीतून अमाप पैशाची उधळपट्टी सुरु आहे. पालिकेतील पैसा खर्च होत आहे. कारण विचारायला कोणीच नाही. एफडीतून ७ ते ९ कोटी खर्च झाले.

आमची सत्ता आल की क्लिनचीटची चर्चा करु. बीएमसीतील हवे ते घोटाळे बाहेर काढा आणि घाबरत नाही. पावसाप्रमाणे निवडणुक लांबत आहेत. निवडणुका घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.गद्दार हे शेवटी गद्दारच राहणार. ह्यांच्या कपाळाचा गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही. नोटिस येतात म्हणून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात का? असा खोचक सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच यंत्रणेचा वापर करुन ठाकरे गट फोडतात. असा आरोपही ठाकरेंनी यावेळी केल.

पूर्वी ६५० कोटी रुपये तुटीत असलेली मुंबई महापालिका आम्ही ९२ हजार कोटी रुपये ठेवी पर्यंत नेली, असे ठाकरे यांनी सांगितले.