शिवसेनेचा निधी, सर्व शाखा आणि शिवसेनाभवन उध्दव ठाकरेंकडेच, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

0
334

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना भवन, सर्व शाखा तसेच निधी एकनाथ शिंदे यांना द्या अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाकडून दाखल करण्यात आली होती. आशिष गिरी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. मात्र, आता ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज (दि.२८) फेटाळली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ (Shivsena)पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्या वकिलाची याचिका फेटाळून लावत दणका दिला. तसेच संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच, यावेळी त्यांनी मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केल असल्याचे म्हटले. यासह त्यांनी, ”मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे असेही म्हटलं होतं